मोहोळ कारागृहातील १३ कैदयाना कोरोनाची लागण

मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये एका महिलेसह १९ कैदी आहे एकूण २० कैदी या कारागृहात आहेत. गेल्या दोन दिवसापासून त्यांना सर्दी खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्या मुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे तपासणी केली असता प्रथम तीन पेशंट कोरोनाग्रस्त आढळले त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सर्वच कैद्यांची तपासणी करण्याचे पत्र ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी पी पी गायकवाड यांना देण्यात आले

    मोहोळ : मोहोळ येथील पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या काराग्रह मधील २० कैदी पैकी एका महीले सह १३ जणांना कोरोना ची लागण झाल्याचे कळताच मोहोळ पोलिस स्टेशन परिसरा मध्ये मोठी खळबळ उडाली.

    या बाबत माहिती अशी की, मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये एका महिलेसह १९ कैदी आहे एकूण २० कैदी या कारागृहात आहेत. गेल्या दोन दिवसापासून त्यांना सर्दी खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्या मुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे तपासणी केली असता प्रथम तीन पेशंट कोरोनाग्रस्त आढळले त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सर्वच कैद्यांची तपासणी करण्याचे पत्र ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी पी पी गायकवाड यांना देण्यात आले त्यांनी कोरोनाचे किट्स मागून घेऊन सर्व कैद्यांची तपासणी केली असता दहा पेशंट दुसऱ्या दिवशी आढळून आले. एकुण १३ पेशंत सापडले यामुळे पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि आवारामध्ये मोठी खळबळ उडाली सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना सोलापूर येथील वैद्यकीय छत्रपती सर्वउपचार केंद्र येथे पाठवण्यात आले. त्यानंतर सर्व पोलीस ठाणे सॅनिटाझर करण्यात आले त्याच बरोबर कैदी मध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांचे देखील तपासणी करण्यात आली त्यांचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत शहर सोलापूर मंद्रुप कामती आदी पोलीस ठाण्यातील जादा झालेले कैदी मोहोळ येथील काराग्रहात पाठवले जातात. त्यामुळे अशा कैद्यांना किंवा त्यांना भेटावयास आलेल्या जेवण घेऊन आलेल नातेवाईक यांच्या पैकी कोणाला तरी कोरोना असल्याची शक्यता असल्याने या कैद्यांन कोरोना झाला असेल, असे सांगत सर्व पोलिसांना कोरोना लस १०० टक्के देण्यात आली अशी माहिती सायकर यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली.