कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात सर्व विभाग प्रमुख यांची विशेष बैठक

जिल्हा परिषेदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलजीवन मिशनमध्ये नळजोडणीचे काम उत्कृष्ठ केल्याबद्दल कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांचा गौरव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.अर्जुन गुंडे यांचे हस्ते करण्यात आला.

  सोलापूर : सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाटयाने वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख यांनी
  दिलेली जबाबदारी अतिशय जबाबदारी व प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे.कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात सर्व विभाग प्रमुख यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपली बुद्धी व कल्पना यांचा चांगल्या पद्धतीने वापरणे आवश्यक आहे.कामामध्ये काही अडचण असेल तर मला सांगा.सदर कामामध्ये कोणाचाही हलगर्जीपणा नको.अशांना काळ माफ करणार नाही अन्यथा अशा अधिकारी व कर्मचारी यांना मी गांभीर्याने घेणार आहे आशी माहीती
  मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

  यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) परमेश्वर राऊत,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंचल पाटील , महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख , मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार आदी अधिकारी उपस्थित होते.

  शिक्षण विभागाने स्वाध्यायमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकाविल्याबद्दल शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) संजयकुमार राठोड व शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) बाबर यांचा गौरव मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते व जिल्हा परिषेदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलजीवन मिशनमध्ये नळजोडणीचे काम उत्कृष्ठ केल्याबद्दल कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांचा गौरव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.अर्जुन गुंडे यांचे हस्ते करण्यात आला.