नगरसेविकेचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

प्रभाग क्रमांक मधील १५  हार्ट लाईन कंपाऊंड येथे गेल्या २५ दिवसांपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा होत होता तो पाणी पुरवठा पालिकेच्या अधिकाऱ्याकडून बंद करण्यात आला होता यामुळे स्थानिक नागरिकांचे पाण्या वाचून अडचणी निर्माण होत होत्या येथील लोक पाण्यासाठी अजूबाजूच्या भागात पाण्या करिता वणवण फिरण्याची वेळ आली आहे .

    सोलापूर : वारंवार मागणी करून देखील पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून प्रभागातील सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्या नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी प्रभागातील नागरिकांच्या समवेत पालिका आयुक्तांच्या दालना समोरच्या पाय-यावर ठिय्या आंदोलन केले ,आंदोलना नंतर आयुक्तानी प्रभाग पंधरा मधील हार्ट लाईन भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.

    प्रभाग क्रमांक मधील १५  हार्ट लाईन कंपाऊंड येथे गेल्या २५ दिवसांपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा होत होता तो पाणी पुरवठा पालिकेच्या अधिकाऱ्याकडून बंद करण्यात आला होता यामुळे स्थानिक नागरिकांचे पाण्या वाचून अडचणी निर्माण होत होत्या येथील लोक पाण्यासाठी अजूबाजूच्या भागात पाण्या करिता वणवण फिरण्याची वेळ आली आहे .नगरसेविका नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी पाण्याच्या संबधी होत असलेली जनतेची होरपळ संबधित अधिकाऱ्यांना देऊन देखील पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही.

    म्हणून नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसह सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयच्या पायरीव ठिय्या आंदोलन करण्यात आले.पालिकेतील अधिका-यांच्या नियोजन शुन्य कारभारा मुळेच हार्ट लाईन कंपाउंड येतील पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देताच तात्काळ हार्ट लाईन कम्पाऊंड येथे टॅंकर ने पाणी पुरवठा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याची माहिती नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी दिली

    यावेळी प्रभागातील शशी रावडे नितीन नवगिरे प्रमोद भालेराव अमोल काशीद मोनिका सरकार सुनिता गायकवाड उपस्थित होते.अमित साळवी संतोष शिंदे राजेश नवगिरे स्मिता अडसुळे सुनंदा कांबळे अनिता भालेराव ज्योती जाधव सुनंदा कांबळे सुवर्णा काळे रूबी कसबे राजेश नवगिरे सविता साठे सुवर्णा काळे एलिजाबेथ शिंदे सुनंदा कांबळे उर्मिला स्वामी सोनी शिंदे उषा घाटे संगीता पवार ममता आखाडे मोनिका शिंदे अमोल काशीद प्रकाश अडसूळ व प्रभागातील इतर नागरिक उपस्थित होते.