अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्वखर्चातुन कोविड केअर सेंटर; सीईओ दिलीप स्वामी यांची संकल्पना

    सोलापूर : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी पुढे सरसावले आहेत. प्राथमिक लक्षणे असलेल्या कोरोना रूगणांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क) येथील नेहरू वस्तीगृहात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्वखर्चातून ५० बेड क्षमतेचे कोविड केअर हॉस्पीटल साकारण्यात आले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे ,अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांच्या हस्ते उध्दघाटन करण्यात येणार आहे. सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. जि.प.कर्मचारी पतसंस्था क्र १ आणि जि.प.नंबर वन फाऊंडेशन यासह पतसंस्था क्र.२ नी आपले योगदान दिले आहेत. कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी दैनंदिन योग प्राणायम, व्याख्यान ,ध्यान, किर्तन,मनोरंजन ठेवण्यात येणार आहे. यासह रूग्णांच्या देखभालीसाठी तंज्ञ डॉक्टारांची टिम तैनात करण्यात येणार आहे.

    स्वखर्चातून उभारणी

    अधिकारी कर्मचारी ,पतसंस्था ,विविध जि.प.संघटनेच्या योगदानातून केअर सेंटर उभे करण्यात आले आहे. शासकीय निधी न घेता स्वखर्चातून मोफत सेवा देण्यात येणार आहे. अशी माहिती सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली. सीईओ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जि.प.पतसंस्था क्र १ आनि नंबर वन फाऊंडेशनच्या वतीने संपूर्ण ५० बेडसेट कोविड केअर सेंटरला देण्यात आले आहेत.यापूर्वी ३हजार १०० लिटरचे सॅनीटायझर आणि गरजूना धान्य वाटप फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.