सोळा लाखांच्या घरफोडीतील आरोपी मुद्देमालासह ताब्यात ; पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी

पंढरपूर : शहरातील मध्यवस्तीत नवी पेठ मध्ये राहणारे अजित फडे हे परगावी गेलेले असताना त्यांच्या घरात मध्यरात्री शिरून घरफोडी करणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे १२ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

पंढरपूर : शहरातील मध्यवस्तीत नवी पेठ मध्ये राहणारे अजित फडे हे परगावी गेलेले असताना त्यांच्या घरात मध्यरात्री शिरून घरफोडी करणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे १२ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. गोळा घडल्यानंतर केवळ पंधरा दिवसांत पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी पेठ भागात राहणारे व्यापारी अजित फडे हे आपल्या मुलीला पुणे येथे पोहोचण्यासाठी गेले असता, घरात कोणी नसल्याचे पाहून सराईत चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्या-चांदीची भांडी, मोबाइल व रोख रक्कम मिळून सुमारे सोळा लाखाचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी फडे यांनी फिर्याद दिल्यानंतर, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, यापूर्वी घरामध्ये नोकरी करणारे नोकर व वावरणारे इसम यांच्यावर पाळत ठेवून या घरफोडी चा शोध लावण्यात यश मिळवले.

या गुन्ह्यातील घटनास्थळावरून असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजवरून शोध घेतला असता, संशयास्पद काहीही आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी यापूर्वी घर कामात असणारे नोकर व सातत्याने ये-जा करणारे यांच्यावर पाळत ठेवून, इस्मा या आधुनिक पद्धतीने शोध घेतला असता, एका इसमाच्या संशयास्पद हालचालीमुळे शंका आल्याने, त्यांची अंगझडती घेतला घेतली असता मुद्देमालासह मुद्देमालातील मोबाईल त्याच्याकडे आढळून आला आणि या गुन्ह्याचा शोध लागला. त्याच्याकडून चोरी केलेल्या मालाची माहिती विचारली असता, ९लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व इतर ऐवज मिळून ११ लाख वीस हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदर कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम तसेच पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.