पंढरपुरात कार्तिकी यात्रेदरम्यान संचारबंदी लागू; ‘विठ्ठला, हा कोरोना लवकर जाऊ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना’

कालच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले मर्यादित स्वरुपातच ही यात्रा साजरी करावी याबाबत सहमती दर्शविली आहे. या ठिकाणची एसटी वाहतूकही या संचारबंदीच्या काळात बंद राहणार आहे.

पंढरपूर : १६ नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणीही तात्काळ सुरू आली. दिवाळीत लोकांनी नियमभंग केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे. याचाच आधार घेत कार्तिकी यात्रेत हा प्रादुर्भाव अधिक गंभीर रूप धारण करू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूर परिसरात २२ ते २६ नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

२२ तारखेला रात्री १२ वाजल्यापासून ते २६ तारखेला रात्री बारापर्यंत ही संचारबंदी लागू राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. कालच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले मर्यादित स्वरुपातच ही यात्रा साजरी करावी याबाबत सहमती दर्शविली आहे. या ठिकाणची एसटी वाहतूकही या संचारबंदीच्या काळात बंद राहणार आहे.

ज्याप्रमाणे आषाढी वारीही प्रतिकात्मक पद्धतीने साजरी केली त्याचपद्धतीने कार्तिकी वारीही साजरी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने केले आहे. यंदाची कार्तिही यात्रा ही घरातच राहून साजरी करा. जेणेकरून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.