solapur Zp

सभागृहात सभा घेण्याचे नियोजन कसे आहे. या सभेला परवानगी देणार का असे नगरसेवकांनी विचारले. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना ऑनलाइन सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका क्षेत्रात निर्णयाचे अधिकार आम्हाला आहेत. झेडपीच्य सभेला परवानगी मिळणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर वरून सदस्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरत आहे

    सोलापूर : सर्वसाधारण सभा घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सभागृह घेण्यासाठी शहरात भटकंती करावी लागत आहे. कोरोना आपत्ती काळामुळे सभागृह देण्यास महानगरपालिका आयुक्त शिवशंकर यांनी नकार दिला आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेची तारीख पे तारीख हा सिलसिला सुरू आहे .राज्याच्या नगरविकास खात्याच्या निर्देशानुसार सभा ऑनलाइनच आदेश महानगर पालिकेला देण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेचे फडकुले सभागृहात सभा घेण्याचे नियोजन केले असेल. पण आम्ही परवानगी देणार नाही, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.

    जिल्हा परिषदेची सभा फडकुले सभागृहात होणार आहे. त्यानुसार महापालिकेची सभा ऑनलाइन न घेता हुतात्मा स्मृती मंदिरात घेण्यात यावी अशी मागणी एमआयएमचे गटनेते रियाज खरादी, भाजपचे नागेश वल्याळ, काँग्रेसचे नरसिंग कोळी, शिवसेनेचे राजकुमार हंचाटे यांनी गुरुवारी आयुक्तांकडे केली.

    अधिकार मनपा आयुक्तांना
    सभागृहात सभा घेण्याचे नियोजन कसे आहे. या सभेला परवानगी देणार का असे नगरसेवकांनी विचारले. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना ऑनलाइन सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका क्षेत्रात निर्णयाचे अधिकार आम्हाला आहेत. झेडपीच्य सभेला परवानगी मिळणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर वरून सदस्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरत आहे. १२ जुलै रोजी खुल्या सभागृहात सभा घेण्यासाठी सदस्यांनी ऑनलाइन सभेवर बहिष्कार टाकत मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील पायरीवर बसून ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनात अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचाही सहभाग होता मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आश्वासनानंतर सर्वसाधारण सभा खुल्या सभागृहात घेण्यात येईल ,असे आश्वासन देण्यात आले आणि १९ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली. मात्र या दिवशी आषाढी यात्रा असून पंढरपुरात मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय पुजेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे राजशिष्टाचार पालन करण्यासाठी सर्व अधिकारी पंढरपूर येथे उपस्थित असणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर १९ जुलै रोजीची सर्वसाधारण सभा निश्चित करण्यात आलेली तारीख पुढे ढकलण्यात आली २२ जुलै ही तारीख नेमण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे २६ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्वसाधारण सभा खुल्या सभाग्रहात घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. यावर कोणता निर्णय होईल याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.सर्वसाधारण सभेचे म्हणून सदस्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे खुल्या सभागृहातच सभा घेण्याची मागणी लावून धरली आहे.