दत्तात्रय कराळे हे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त

सांगली जिल्ह्यातील एरडोली तालुका मिरज येथील ते रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे झाले ते पूर्वी सेल टॅक्स ऑफिसर म्हणून काम करीत होते त्यानंतर ते डी वाय एस पी झाले त्यांनी गडचिरोली जळगाव पुणे ठाणे तिथे सेवा बजावली यानंतर ते पदोन्नतीने सोलापूरचे आयुक्त म्हणून बदली झाली अशी माहिती मिळत आहे.

    सोलापूर : महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली आहे त्यांच्या जागेवर ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    मागील अनेक दिवसांपासून सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बदलीची चर्चा ऐकण्यास मिळत होती त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.