Deputy Chief Minister Ajit Pawar's son Partha Pawar may get candidature in Pandharpur by-election

२०१९ मध्ये पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, ही पोट निवडणुक त्यांना फारशी कठीण जाणार नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. यासाठी पार्थ पवारांचे नाव चांगलेच चर्चेत आहे

माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी आमदारकीसाठी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तसे पत्रही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, पार्थ पवार पंढरपूरमध्ये आल्यास रखडलेली विकासकामं लवकर होतील. त्यामुळे पार्थ यांना संधी दिली जावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी पत्राद्वारे शरद पवारांकडे केली आहे.
आता शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

२०१९ मध्ये पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, ही पोट निवडणुक त्यांना फारशी कठीण जाणार नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.