सीईओंच्या उदासीनतेमुळे  विकासकामे रखडली ; जि.प.सदस्या लक्ष्मी आवटे यांचा आरोप

आता निवडणुका झाल्या आचारसहिता संपली आहे. तर १५ वा वित्त आयोगातील निधी हा खर्च करण्यासाठी देणे अपेक्षित असताना ग्रामीण भागात त्यामुळे विविध विकास कामांवर प्रभाव पडतो आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पावसाळ्यापूर्वी होणारी कामे होणार नाहीत. तर पावसाळ्यात ती कामे करता येणार नाहीत. मग शिल्लक राहिलेला निधीच करायचं काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषद सीईओ यांच्या उदासिन कारभारमूळे विकास कामे रखडली असल्याचा आरोप सदस्या लक्ष्मी आवटे यांनी केला आहे.
    पंधरावा वित्त आयोगातील निधी चे वाटप केल्या नसल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना खिळ बसत. पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणारी कामे होणार नसल्याचे चित्र निष्क्रिय नियोजनामुळे रखडली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी सीईओ यांचा आळशीपणाची भूमिका कारणीभूत ठरत असल्याचे सदस्या आवटे म्हणाल्या.. दलित वस्ती , नालाखोलीकरण, जनसुविधा, नागरिसुविधाच्या कामांना आदयपर्यंत प्रशासकीय मान्यता देण्यात आले नाही केवळ वेळकाढूपणा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

    जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार असताना ग्रामीण भागात रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाही. रेमडीसिवीर इंजेक्शन मिळत नाही. ऑक्सिजन पुरवठा कमी आहे. याकडे लक्ष देण्याचे गरजेचे असताना दुर्लक्ष करण्यात येत आहे. लसींचा तुटवडा भासत असताना ग्रामीण भागात केवळ शंभर ते दोनशे लस पाठवल्या जातात. त्या किती लोकांना पुरणार आहे. वयस्कर लोक रांगा लावून उभा असताना त्यांना माघारी पाठवायची वेळ प्रशासनावर येत आहे. ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे लोकांचे जीव जात आहे. तरीही प्रशासन म्हणून त्याच्याकडं मुख्य कार्यकारी अधिकारी काहीही करू शकत नाहीत हे त्यांचा अपयश आहे.

    शिवाय आता निवडणुका झाल्या आचारसहिता संपली आहे. तर १५ वा वित्त आयोगातील निधी हा खर्च करण्यासाठी देणे अपेक्षित असताना ग्रामीण भागात त्यामुळे विविध विकास कामांवर प्रभाव पडतो आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पावसाळ्यापूर्वी होणारी कामे होणार नाहीत. तर पावसाळ्यात ती कामे करता येणार नाहीत. मग शिल्लक राहिलेला निधीच करायचं काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपला आळस झटकून पुन्हा कामाला लागावे अशी मागणी नागरिक करत असल्याच्या सदस्या आवटे म्हणाल्या.