मोहोळ नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १६ मध्ये पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण : सुशील क्षीरसागर

    मोहोळ : मोहोळ नगरपरिषद प्रभाग क्र. १६ मधील जनतेने माझ्यावर विश्वास टाकत मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यामुळे माझ्या कार्यकाळात ५ कोटी ५ लाख एकूण १२ विकास कामे पूर्ण झाली आहेत. व २ कोटी १३ लाख रुपयांच्या ५ कामांचे वर्क ऑर्डर झाले असून त्यातील सुभाषनगर येथील काँक्रीट रस्त्याचे काम चालू आहे, असे एकूण ७ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधी मधून १७ रस्त्याची, पाणी पुरवठा व इतर विकास कामे पूर्ण झाली असल्याची माहिती भाजप नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी दिली.

    मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये केलेल्या विकासकामांच्या तपशीलाबाबत नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले की, या प्रभागातील कामासाठी लागणारा निधी हा मागील राज्य शासनाच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषद सहाय्यता निधी योजनेतून १ कोटी दिले होते. त्यातून माझ्या प्रभागात ८७ लाखाचे ३ रस्त्यांची कामे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक असलेल्या प्रभाग क्र.१२ मध्ये १३ लाखाचे एक रस्त्याचे काम झाले आहे.

    जिल्हास्तरावर राज्यशासनाच्या नगर विकास खात्याकडून आलेल्या नागरोत्थान, पायाभूत सुविधा व इतर योजनेतून, मोहोळ नगरपरिषद प्रशासन व माझ्या प्रयत्नातून आणलेल्या निधीतून ८ रस्त्यांची व इतर कामे झाली आहेत. तसेच आमदार यशवंत माने यांनी नगरविकास खात्याकडून विशेष निधी म्हणून आणलेल्या निधीमधून २.५ कोटीचा निधी प्रभाग क्रमांक १६ च्या मधील ४ रस्त्यांच्या कामासाठी खर्चला असल्याचेही यावेळी नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी सांगितले.

    यासह आमदार यशवंत माने यांनी माझ्या प्रभागात २ कोटी ५ लाख रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामाकरिता मोहोळ मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने निधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मात्र, माने हा निधी राष्ट्रवादी नगरसेवकाच्या वॉर्डात न देता राजकीय हेतूने या वॉर्डात दिला होता. प्रभाग क्र. १६ हा देखील विधानसभा मतदार संघाचा भाग आहे आणि येथे ही निधी देणे हे त्यांचे कर्तव्य आहे, परंतु त्या प्रभागाच्या लोकप्रतिनिधीला डावलून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी घेऊन या कामांचा लोकार्पण सोहळा सूड बुद्धीने घेतला. अशाप्रकारे जनतेची दिशाभूल करणे हे एका लोकप्रतिनिधीला अशोभनीय असल्याचे ही यावेळी क्षीरसागर यांनी सांगितले.

    यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, भाजपा तालुका सरचिटणीस महेश सोवनी, भाजपा नेते मुजीब मुजावर, भाजपा नेते नावनाथ गाढवे, दिनेश दादा गडदे, शहर सरचिटणीस विशाल डोंगरे, आर पी आय नेते फारूक शेख, औदुबर वाघमोडे, सागर लेंगरे, प्रशांत गाढवे, सुनील गाढवे, नावनाथ चव्हाण इत्यादी उपस्थित होते.