dhairyasheel mohite patil

अकलूज ग्रामपंचायत निवडणूक संपताच मी राजकारणातून संन्यास घेणार आह, असे धैर्यशील मोहिते पाटील(dhairyasheel mohite patil) यांनी म्हटले आहे. मी ज्या विविध संस्थांवर काम करत आहे.त्या सर्व ठिकाणचे राजीनामे देणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अकलूज: माळशिरस तालुक्यातील अकलूजच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जबाबदारी विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली असताना आमच्यातर्फे एक उमेदवार माघारी घेतो. हे फसवून झाले. मी व आमचे कुटुंबीय कार्यक्रमानिमित्तबाहेर गावी गेलो. त्यामुळे उणीव राहिली व आमच्याकडून एक जागा विरोधकांना बिनविरोध मिळाली. याची पूर्ण जबाबदारी स्वीकारून अकलूज ग्रामपंचायत निवडणूक संपताच मी राजकारणातून संन्यास घेणार आह, असे धैर्यशील मोहिते पाटील(dhairyasheel mohite patil) यांनी म्हटले आहे. मी ज्या विविध संस्थांवर काम करत आहे.त्या सर्व ठिकाणचे राजीनामे देणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाटील म्हणाले की, खरे तर अकलूज नगरपंचायतीमुळे सामान्य माणसाला न्याय मिळेल म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो. सर्व पक्षांच्या वतीने आम्ही सर्वांना बरोबर विचारात घेऊन चाललो होतो. यावर ७०% जणांनी सहमती दर्शवली होती. अनेकांनी याला विरोध केला. यात आर.पी.आय.चे धाईंजे, शिवसेनेचे दत्ता पवार, नामदेव वाघमारे, अण्णा कुलकर्णी यांच्या सह अनेक पक्षाच्या नेते मंडळींनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. त्या सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला जिल्हा स्तरावर मोठा फटका बसेल. ही पत्रकार परिषद त्यांनी फेसबुक वर लाईव्ह घेतली होती. त्यामुळे पत्रकार परिषद संपता संपताच त्यांचा फोन वाजू लागला पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते.

मोहिते पाटील भाजपामध्ये आल्यापासून तालुका व जिल्ह्यातील नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा व समाजकारणात सर् सामान्यांना बरोबर असणारा एक उमदा नेता सन्यास घेत असल्याचे ऐकून पत्रकारही अवाक झाले होते. त्यांच्या या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा,असेही पत्रकारांनी त्यांना सुचवले. ते आपल्या निर्णयावर ठाम होते.त्यामुळे आता पुढे काय हाच प्रश्न निर्माण झाला आहे.