…ही तर पालकमंत्र्यांसाठी नामुष्कीची गोष्ट : धैर्यशील मोहिते-पाटील 

    अकलूज : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माळशिरस तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सुमारे १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु, संबंधित खात्याकडून कामच सुरु न झाल्यामुळे हा निधी विद्यमान सरकारने माघारी घेतला. यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकाळात एवढा मोठा निधी माघारी जातो. ही त्यांच्यासाठी नामुष्कीची गोष्ट असल्याचे भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहीते-पाटील यांनी सांगितले.

    सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मंजुर कामांचा निधी माघारी जातो. हा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व आघाडी शासन करण्याचा दुर्लक्षपणा त्यामुळे निधी माघारी जातो. ही तर पालकमंत्र्यांची नामुष्कीच आहे, असेही धैयशील मोहिते-पाटील यांनी सांगितले. माझी मुंख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यातील दोन ठिकाणी 10 कोटी निधी पर्यटन विकासासाठी मंजूर केला होता. एक कोटी टोकण दिले होते. ते एक कोटी पर्यटन विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी ऑफिसकडे वर्ग केले होते. संबंधित खात्याकडून दोन वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारच्या हालचाली प्रशासनाच्या वतीने झालेल्या दिसून येत नाहीत.

    मागील सकारने नातेपुते येथील शिवकालीन दुरुस्ती व अकलुज येथील तारागंण निमित्तीसाठी 2019 मध्ये 10 कोटी रुपये मंजूर केले होते. नातेपुते येथील शिवकालीन मंदिर व तलावाच्या कामासाठी 2 कोटींचा निधी मंजूर झाला होता. यामध्ये तलावाच्या बाजूने पदपथ तयार करणे तलावाच्या दोन्ही ठिकाणी घाट बांधणे, दोन खोल्या व बेस कँम्प तयार करणे. पाणी पुरवठा व स्वच्छतागृह बांधणे या कामांचा समावेश होता. याशिवाय अकलुज येथे तारांगण व शिल्पसृष्टीचे बांधकाम करण्यासाठी 8 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.

    सष्टेबर 2019 मध्ये मागील सरकारने अनेक कामांना मंजूरी दिली होती. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात दोन कामांचा समावेश होता. ही दोन्ही कामे मागील सरकारने मंजूर केली होती. यामध्ये पर्यटनाचा विषय होता व अकलुजमधील विषय होता. दोन्ही मिळून 10 ते 12 कोटींचे बजेट असलेले प्रकल्प होते. जेणेकरुन या ठिकाणच्या लोकांना पर्यटनाच्या दुष्टीकोनातून फायदा व्हावा व नवीन पर्यटनाचे दालन उभे राहावे. सुखसुविधा व्हाव्यात या दुष्टीकोनातून केलेले काम आहे. केवळ या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि लोकप्रतिधी चालू आघाडी सरकारच्या बाजूस बसले आहेत. त्यांच्या निषकाळजीपणामुळे निधी परत गेला.

    सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गेलेला निधी माघारी आणावा. या ठिकाणच्या कामाची सुरूवात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना द्यावेत आणि हा माळशिरस तालुक्यावर झालेला अन्याय दूर करण्याच्या हालचाली पालकमंत्र्यांनी करावा.

    पुढे बोलताना मोहिते पाटील म्हणाले की, कशामुळे दोन वर्ष दिरंगाई झाली ते अजून समजले नाही. पालकमंत्री भरणे यांना विनंती आहे की, हा विषय महत्त्वाचा आहे असे समजून घ्यावा. पालकमंत्र्यांच्या काळात मंजुर निधी माघारी जातो. ही त्यांची नामोषकी तर आहेच तसेच त्यांचा वचक सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनावर पाहिजे की आलेला निधी 100% निधी ‘ खर्च  झाला पाहिजे.