धनगर प्राध्यापक महासंघ महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सांगोल्याचे प्रा. भानवसे

    मोहोळ : धनगर प्राध्यापक महासंघ महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सांगोल्याचे प्रा. धनाजी भानवसे व उपाध्यक्षपदी मोहोळचे प्रा. चंद्रकांत देवकते यांची निवड करण्यात आली.

    महाराष्ट्रातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी समाजप्रबोधनातून समाज परिवर्तन या हेतूने राज्यातील धनगर प्राध्यापक महासंघ महाराष्ट्र राज्य ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष विजय सिरसट यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीसाठी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष डॉ. ज्ञानदेव काळे (जळगाव) यांनी काम पाहिले. या बैठकीच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष विजय सिरसट (चाळीसगांव जि. अहमदनगर ) होते. या बैठकीमध्ये सर्वानुमते खालीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली.

    अध्यक्ष प्रा. धनाजी भानवसे (सांगोला), उपाध्यक्ष: प्रा चंद्रकांत देवकते (मोहोळ), सचिव: डॉ डी. एस. थोरात सर (नातेपुते), खजिनदार:  प्रा मारुती हजारे, (मंद्रुप), संघटक: डॉ देवेंद्र मदने, (सोलापुर) अध्यक्षा महिला आघाडी: प्रा सविता दुधभाते, (पंढरपूर)

    या संघटनेच्या स्थापनेच्या हेतूबाबत प्रदेशाध्यक्ष प्रा. विजय सिरसट म्हणाले की, या महासंघाच्या माध्यमातून समाजातील विविध विषयावर करण्यात येणाऱ्या संशोधनाला प्रेरणा देणे व मदत करणे, बेरोजगारी, महिलांच्या विविध समस्या, नोकरीमधील प्रशासकीय अडचणी, यासह समाजाची निगडीत असणाऱ्या विविध समस्येवर संघटना कार्यरत राहणार असून, ही बिगर राजकीय संघटना असल्याचे सांगितले.