आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचं राज्यभर आंदोलन, नेत्यांकडून ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’चा नारा

धनगर समाजाने आज शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलनाला (agitation for reservation) सुरूवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'ढोल बजाओ सरकार जगाओ' अशा घोषणा देत आंदोलन केले जात आहेत. पंढरपुरात आ़ गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar in Pandharpur) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे.

सोलापूर : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने आज शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलनाला (agitation for reservation) सुरूवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ सरकार जगाओ’ अशा घोषणा देत आंदोलन केले जात आहेत. पंढरपुरात आ़ गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar in Pandharpur) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. तर सोलापूर शहरात (Solapur city) चार हुतात्मा पुतळ्याशेजारी असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरूवात झाली़. धनगरी ढोल वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

माळशिरस येथे सकाळी धनगर समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलनाला सुरूवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातही आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. जे आदिवासींना तेच धनगरांना, अशी घोषणा देत ढोलताशे धनगर समाजबांधव रस्त्यावर उतरला आहे. नांदगावला तहसील कार्यलायवर मोर्चा काढून ‘डफली बजाव’ आंदोलन करण्यात आलं.

बीडमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव तहसिल कार्यलयासमोर ढोल वाजवून सरकारला जाग करण्यासाठी अंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो धनगर बांधव सहभागी झाले. ७० वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न रखडला आहे, धनगड आणि धनगर या शब्दांमधील गोंधळामुळे आरक्षणाचा वनवास सुरू आहे तो संपवा, अशी मागणी करत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.