नवभारत ग्रुपच्या राज्यस्तरीय एज्युकेशन पुरस्काराचे धनराज शिंदे ठरले मानकरी

  माढा : नवभारत वृत्तपत्रसमुहाचा राज्यस्तरीय एज्युकेशन पुरस्कार ता. प. सदस्य तथा माढा वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष धनराज रमेश शिंदे (Dhanraj Shinde) यांना जाहीर झाला असून, सोमवार ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील विले पार्ले येथील ऑरचिड पंचतारांकित हॉटेलमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.

  शेतकऱ्यासह गोरगरिब कुटुंबातील मुलींना शाळेत जाण्यासाठी माढा तालुक्यातील ७०० हून अधिक मोफत सायकलीचे वाटप करुन मुलींच्या शिक्षणाला गती देण्याचे मोठं काम त्यांनी केले आहे. याच कार्याची दखल घेत त्यांना एज्युकेशन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री डाॅ.विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवरांची उपस्थिती पुरस्कार सोहळ्यास असणार आहे. सकाळी १०.३० वाजता दिप प्रज्वलनाने समारंभाची सुरुवात होईल. पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोरोना काळातील शिक्षण प्रणाली या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.

  आजोबा स्व.विठ्ठलराव शिंदे यांचा वारसा तर माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे,करमाळ्याचे संजय मामा शिंदे या दोन काकाचे आणि वडील उद्योजक रमेशराव(मालक)शिंदे यांच्या मार्गदर्शनातुन धनराज शिंदे यांची यशस्वी घौडदौड सुरु आहे.

  माढा तालुका पंचायत समितीचे वयाच्या २१ वर्षीच सदस्य होणाचा बहुमान त्यांनी राज्यात पटकावला. राजकारणाला समाज कारणाची जोड देत त्यांचे सुरु असलेले काम उल्लेखनीय असेच आहे. माढा वेल्फेअर फौंडेशन व विठ्ठ्ल गंगा प्राड्युसर कंपनीच्या माध्यमातून धनराज शिंदे यांची सर्व सामान्यांशी नाळ जोडली गेलेली आहे.

  शेतकरी गोरगरिब कुटूबांतील मुलींना शाळेत जाण्यासाठी माढा तालुक्यातील ७०० हून अधिक मोफत सायकलीचे वाटप त्यांना केले आहे.या कामी त्यांना सामाजिक संस्थाची मदत देखील लाभली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या अशा ३५ किमी ओढ्याचे खोलीकरणाचे काम केले आहे.

  तसेच शेतकर्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळवुन देण्यासाठी स्थापन केलेल्या विठ्ठ्ल गंगा सुसज्ज अशी फार्मस प्रोड्युसर कंपनीवर विश्वास ठेवत ४ हजारांहून अधिक सभासद संख्या झाली आहे. कोव्हिड महामारीच्या काळात देखील धनराज शिंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून २५ लाखांची वैद्यकिय साहित्याचे वाटप करीत मदतीचा हात दिला आहे.