जलसाक्षरतेची व्यापक चळवळ करा : दिलीप स्वामी

    सोलापूर : पाऊस चांगला झाला असता तरी पाणी जपून वापरले पाहिजे. जलसाक्षरता ही काळाची गरज आहे. जलसाक्षरतेची व्यापक चळवळ करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

    जिल्हा परिषदेत माजी कक्षात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने 2 ऑक्टोबरपासून सोलापूर जिल्ह्यातील जलसाक्षरतेच्या दृष्टीने सदर बैठकीस यशदाचे उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, सोलापूर जिल्हा परिषदेचे

    अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रमुख उपस्थित होते.

    या प्रसंगी बोलताना दिलीप स्वामी म्हणाले, सोलापूर जिल्हा अवर्षण प्रवणमध्ये येतो. उजनी धरणावर बरेचसा भाग अवलंबून आहे. असा स्थितीत शेतीचे पाणी असे कि वापराचे पाणी याबाबत काळजी घ्यायला हवी. दररोज पाण्याचा वापर काळजीपुर्वक करायला हवा. वीजेच्या बचतीबरोबर पाण्याची बचत देखील होणार आहे. पुनर्भरण होणे अपेक्षित आहे मग ते विहिरींचे असो कि विंधन विहिरींचे असो. शासकीय इमारती देखील जल पुनर्भरण झाले पाहिजे. जल साक्षरता ही महत्वाची बाब आहे. हे जागृतीने शक्य आहे. यामध्ये जलदुतांची भुमीका खुप महत्वाची आहे. डाॅ. मल्लिनाथ कळशेट्टी हे गेल्या अनेक वर्षापासून पाणी व स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्याचे मार्गदर्शन महत्वपुर्ण आहे.

    यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे संचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, पाण्याची साक्षरता होण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. जनजागृतीमुळे लोक जल साक्षर होतील. साक्षरतेशिवाय पाण्याचे महत्व समजणे अवघड आहे. भविष्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलसाक्षरतेशिवाय पर्याय नाही. विशेषत सोलापूर जिल्ह्यास जलसाक्षरतेची खुप गरज आहे. जलनायक, जलदुत यांचा भुमीका महत्वाची आहे. जलसाक्षरतेची व्यापक चळवळ उभारणेसाठी जलनायकांचे योगदान महत्वपुर्ण आहे. असेही त्यांनी सांगितले.