maratha reservation

मराठा समाजाने आक्रोश मोर्चा पुकारल्याने पोलिसांनी मंदिराच्या चारही बाजूने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच अंदोलनस्थळावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे.

पंढरपूर : मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरणात आता मराठा समाजाने (Maratha community) आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर ते मंत्रालय पायी दींडी मोर्चा निघणार आहे. मराठा समाजाता आरक्षण प्रकरणावरुन मोठा संताप व्यक्त होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यामुळे मराठा समाजात मोठा नाराजीचा सूर उमटला आहे. यामुळे मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने या मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. पंढरपरमधील श्रीक्षेत्र नामदेव पायरीवरुन आज सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात मराठा बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.(Dindi Morcha to leave Pandharpur for Mantralaya)

पंढरपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू

मराठा क्रांती आक्रोश मोर्चा पंढरपूर प्रशासनचाचे आदेश धूडकावून पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. पंढरपूर प्रशासनाने म्हटले होते की, पायी मुंबई दींडी काढू नये, यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. परंतु ही बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळेच हा मोर्चा काढण्यावर मराठा समाज बांधव ठाम आहेत.

मराठा समाजाने आक्रोश मोर्चा पुकारल्याने पोलिसांनी मंदिराच्या चारही बाजूने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच अंदोलनस्थळावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे.