जावेद शेख यांच्या पदभारावरून सदस्यांची मतभिन्नता ; कारवाई आहवालाची प्रतिक्षा

-जि.प.अध्यक्ष कांबळे यांच्या भूमिकडे जिल्हयाचे लक्ष

  शेखर गोतसुर्वे , सोलापूर : जिल्हापरिषदेच्या महीलाबाल कल्याण कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्या पदभारावरून सदस्यांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे. पोषण आहार वाटपात अनियमिता झाल्याने त्यांचा पदभार काढून घेण्यात यावा आशी मागणी स्थायी समिती सभेत करण्यात आली होती. चौकशी समितीचा आहवाला अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामूळे त्यांच्या भूमिकेकडे जिल्हयाचे लक्ष लागून राहीले आहे.

  याबाबत माहीती आशी की गरोदर माता आणि बालकांना महीलाबाल कल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या पोषण अहारात अनियमित झाल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील, त्रिभूवन धाईंजे, ज्योती पाटील यांनी लावून धरला आहे. सर्वसाधारण सभेच्या आरोपा नंतर सोमवारी झालेल्या स्थायी समिती सभेत पदभार काढण्यावरुन पडसाद उमटले.

  जावेद शेख यांच्या समर्थनार्थ एक गट तर विरोधात एक गट असे चित्र सध्या दिसून येत आहे. सदस्य मदन दराडे, आनंद तानवडे यांनी पदभार काढू नका आशी मागणी केली आहे. जावेद शेख यांच्या कार्यकाळात कोणती ही अनियमिता झाली नाही. २०१२-१३ सालात अनियमिता झाली आहे. त्यामूळे जावेद शेख यांचा पदभार काढता येणार नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी होवून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी आशी मागणी सदस्य दराडे, तानवडे यांनी केली आहे.

   

  अनिरुध्द कांबळे, अध्यक्ष जि.प.

  या सर्व पाशर्वभूमीवर जावेद शेख यांनी अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांची भेट घेत सदस्यांनी केलेल्या सर्व आरोपांची उत्तरे दिली आहेत.अॅडीशनल सीईओ अर्जुन गुंढे यांच्याकडे चौकशी प्रकरण सोपविण्यात आले आहे.

  जावेद शेख यांच्यावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोन दिवसात अहवाल सादर होणार आहे. अहवाला नंतर पाहू तुर्त तरी जावेद शेख यांचा पदभार काढता येणार नाही.

  -अनिरुध्द कांबळे, अध्यक्ष जि.प.
  मदन दराडे सदस्य, जि.प.

  “जावेद शेख यांच्या कार्यकाळात कोणतीही अनियमिता झाली नाही . २०१२-१३ सालातील हे प्रकरण आहे. त्यामूळे त्यांच्यावर पदभार काढण्याची कारवाई चुकीची ठरेल”
  -मदन दराडे सदस्य, जि.प.