Discharge of 2.5 lakh water from Ujani possibility of flood-like situation in Pandharpur
उजनीतून पावणेदोन लाख पाण्याचा विसर्ग, पंढरपुरात पूर सदृश्य परिस्थितीची शक्यता

पावसाचा जोर वाढल्याने उजनी धरणातून सायंकाळी साडेपाच वाजता एक लाख ८० हजार क्युसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, वीर धरणातूनही २३ हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत असून, पंढरपूर शहरात पूर सदृश्य परिस्थितीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोलापूर : उजनी धरण (ujani dam) परिसर व पाणलोट क्षेत्रात सोमवारपासून मुसळधार पाऊस (heavy rainfall) पडत आहे. त्यामुळे उजनी धरणात पाण्याची (water stock increase) वेगाने आवक होत आहे. मागील आठवड्यात भीमा नदीत (bhima river) बंद करण्यात आलेला विसर्ग रविवारपासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

पावसाचा जोर वाढल्याने उजनी धरणातून सायंकाळी साडेपाच वाजता एक लाख ८० हजार क्युसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, वीर धरणातूनही २३ हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत असून, पंढरपूर शहरात पूर सदृश्य परिस्थितीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उजनी धरण १११ टक्के भरले आहे. पुणे जिह्यातील सर्व धरणेही १०० टक्के भरलेली आहेत. गेल्या दोन दिवसांत उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, उजनीत बंडगार्डन व दौंड येथून येणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे उजनी प्रशासनाने खबरदारी म्हणून उजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्यात आले आहे.