प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

    सोलापूर : व्याजाच्या पैशावरून घरात बसून तिघांनी मिळून महिलेस मारहाण केल्याची घटना २९ जूनला चार वाजण्याच्या सुमारास शोभा देवी नगर येथे घडली. याप्रकरणी नसीम इमामसाब मुजावर (वय ५४,रा. शोभा देवी नगर, नई जिंदगी मजरेवाडी सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुन्नी, सोनी, वसीम (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. कमर फंक्शन हॉल, नई जिंदगी सोलापूर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मुजावर या घरामध्ये काम करत होत्या. त्यावेळी हे सर्व आरोपी फिर्यादी मुजावर यांच्या घरात घुसून मुजावर यांनी संशयित आरोपींकडून व्याजाने घेतलेले एक लाख रुपयांचे व्याज व मुद्दल का देत नाही? या कारणावरून आरोपींनी मुजावर यांना घरात घुसून मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी नसीम मुजावर यांना घराबाहेर हाकलून घराला कुलूप लावले.

    संशयित आरोपी सोनी व वसीम यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक ताकभाते हे करीत आहेत.