उत्कर्ष, किरण स्पोर्ट्ससह मंगळवेढाची विजयी सलामी, जिल्हा कुमार निवड चाचणी खो-खो स्पर्धा

    सोलापूर : जिल्हा कुमार निवड चाचणी खो-खो स्पर्धेत शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ मंगळवेढा, किरण स्पोर्ट्स व उत्कर्ष क्रीडा मंडळाने विजयी सलामी दिली. मंगळवेढाने न्यू सोलापूर क्लबला, किरण स्पोर्ट्सने मंद्रूपला तर उत्कर्ष क्रीडा मंडळाने सन्मित्र स्पोर्ट्स क्लबला पराभूत केले.

    उत्कर्ष क्रीडा मंडळाने ही स्पर्धा ह. दे. प्रशालेच्या मैदानावर आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य स्मिता क्षीरसागर यांनी केले. सुरुवातीस स्व. रामचंद्र जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

    यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक हणमंत मोतीबने, महापालिका पतसंस्था व्यवस्थापक किरण तिगलपल्ली, जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, न्यू सोलापूर क्लबचे अध्यक्ष मनोज संगावर, संतोष कदम, उत्कर्ष क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र नाशिककर, बाळासाहेब गायकवाड, निवड समिती सदस्य उमाकांत गायकवाड, शहनशाहा मुजावर व प्रवीण गोवे आदी उपस्थित होते. आशिष अवधूर्थी यांनी आभार मानले.