‘विठ्ठल’च्या गैरकारभाराची चौकशी करा; अभिजीत पाटील यांची मागणी

    पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Vittal Sahkari Sakhar Karkhana) सर्वसाधारण सभेत एक सभासद म्हणून विठ्ठलमध्ये झालेल्या गैरकारभाराच्या चौकशीची मागणी करत संचालक मंडळावर दोषी असल्यास गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करणार असल्याचे डीव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे येत्या 30 तारखेला होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत चांगलीच धुमश्चक्री रंगण्याची शक्यता आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे़

    अभिजित पाटील यांच्या मागण्या…

    – गळीत हंगाम २०१८-१९, १९-२० २०-२१ मध्ये कोणकोणत्या बँकाकडून कर्ज मंजूर झाले.
    – कोणकोणत्या संचालक व त्यांच्या नातेवाईकांकडे किती कर्ज आहे.
    – वसुलीबाबत काय कार्यवाही केली.
    – गळीत हंगाम २०-२१मध्ये साखरेची पोती विकल्याची चौकशी व्हावी़
    – एफआरपी न देणाऱ्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा़
    – १५० टन मोलेसेस निघाले आहे, त्याचा उपयोग न करणारे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे.
    – तोडणी वाहतूकदार, कामगारांची देणी कधी देणार, यासाठी कुठून पैसे उपलब्ध होणार,

    कारखाना सुरू होण्याबाबत चिंता

    गेल्या विधानसभा निवडणुकीपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून सभासदांना मात्र केवळ कारखाना सुरू होईल का, याची चिंता लागून राहिली आहे. कारखाना सुरू झाला तरच ऊस गाळपासाठी पाठवला जाईल. अन्यथा सध्या नोंद केलेल्या ऊस पिकाचे काय करायचे, फक्त याची चिंता सभासदांना लागून राहिली आहे.