आमदारांना निधी देऊ नका ; जि.प. स्थायी सभेत ठराव मंजूर

सभेदरम्यान शिक्षण , आरोग्य, महीला व बालकल्याणच्या विभागांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली. अकलकोट गटशिक्षणअधिका-यांचा पदभार काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कोविड काळात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबदल सीईओ दिलीप स्वामी यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. स्थायी समिती सभा प्रथमचं लॉकडाऊनानंतर खुल्या सभागृहात घेण्यात आली

    सोलापूर : सोलापूर जिल्हयातील कोणत्याही आमदारांना जिल्हा नियोजन आणि सेस फंडाचा कोणता ही निधी देऊ नका असा ठराव जि.प.सदस्य उमेश पाटील यांनी मांडताचं सभागृहात हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

    गुरुवारी अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद स्थायी सभा घेण्यात आली . सभे दरम्यान आमदारांना देण्यात येणाऱ्या “निधी” वरून सभागृहात गदारोळ निर्माण झाला. कोणता ही शासननिर्णय उपलब्ध नसताना जिल्हा परिषदेचा निधी आमदारांना का देता ? असा सवाल उपस्थित करित सदस्य उमेश पाटील यांनी सभागृहात विषय लक्षवेधी केला. कोविड काळात आमदारांनी फक्त “चमकोगिरी ” केल्याचा आरोप सदस्य त्रिभूवन धाईंजे यांनी केला. कोविड उपाय योजनेसाठी आमदारांनी जिल्हा परिषदेला निधी दिल्याचे जाहीर केले मात्र प्रत्यक्षात त्यांनी जिल्हा परिषदेच्या निधीवर चमकोगिरी केल्याचे म्हणणे सदस्य धाईंजे यांनी सभागृहा समोर मांडले.

    सभेदरम्यान शिक्षण , आरोग्य, महीला व बालकल्याणच्या विभागांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली. अकलकोट गटशिक्षणअधिका-यांचा पदभार काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कोविड काळात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबदल सीईओ दिलीप स्वामी यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. स्थायी समिती सभा प्रथमचं लॉकडाऊनानंतर खुल्या सभागृहात घेण्यात आली. दरम्यान बहुचर्चीत”लपाच्या” निधी वाटपाचा विषय सभागृहात लपविण्यात आल्याची चर्चा सदस्यांमध्ये करण्यात आली. भ्रष्ट कारभारावर स्थायी समिती सदस्यानी पांघरुन घातल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

    या सभेस सभापती विजयराज डोंगरे ,सभापती संगीता धांडोरे,सभापती अनिल मोटे, सीईओ दिलीप स्वामी , अॅडीशनल सीईओ अर्जुन गुंडे, यांच्यासह विभाग प्रमूख सदस्य उपस्थित होते.