जि.प.सदस्यांविरोधात डॉक्टर संघटना आक्रमक ; आरोग्य विभागाची बदनामीचा आरोप

सदस्यत्व रध्द करा अन्यथा कोविड कामकाज थांबविण्याचा इशारा

    सोलापूर : आरोग्य विभागाची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषेद सदस्यां विरोधात महाराष्ट्र राज्य राजपत्रीत वैदयकीय अधिकारी गट अ संघटना आक्रमक झाली आहे.
    कोविड लॉकडाऊन काळात आरोग्य विभागाने उत्कृष्ठ कामकाज केले असताना हेतू परस्पर नाहक बदनामी करित वैदयकीय आधिकाऱ्यांचा मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

    बदनामी करणाऱ्या जि.प. सदस्यांचे सदस्यत्व तात्काळ रध्द करा अन्यथा कोविडचे कामकाज थांबवू असा इशारा ही निवेदना द्ववरे देण्यात आला आहे.जिल्हाधिकारी, सीईओ, प्रधान सचिवांना देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.नंदकूमार शिंदे , सचिव डॉ.दिगंबर गायकवाड यांच्यासह वैदयकिय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.