कोळे येथे साकारणार डॉ.आंबेडकर स्मारक ; जि.प.कडून १कोटी १३ लाखांचा निधी मंजूर

-सदस्य अॅड.देशमूख यांच्या प्रयत्नाला यश

    सोलापूर : सांगोला तालूक्यातील कोळे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आणि अस्थी विहार साकारणार आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेनी कामाची निविदा प्रसिध्द केली असून १ कोटी १३ लाखांच्या निधीला सेसफंडातून मंजूरी दिली . गेल्या चार वर्षापासून सदस्य अॅड. सचीन देशमूख यांनी प्रयत्न केला असून त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाल आहे.
    जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत डॉ. आंबेडकर स्मारक आणि अस्थी विहार बांधणी ठराव सर्वानमते घेण्यात आला. माजी जि.प.अध्यक्ष संजयमामा शिंदे अर्थ सभापती विजयराज डोंगरे यांनी निधीला मंजूरी दिली होती. आवघ्या काही दिवसातचं भूमिपूजन होऊन कामकाजाला सुरुवात होणार आहे. नागपूर येथील दिक्षाभूमी दादर येथील चैत्यभूमी सारखी वास्तू उभी करण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण मंत्रालयाकडे ४ कोटीची मागणी आ.संजयमामा शिंदे यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

    डॉ.आंबेडकर स्मारक आणि अस्थी विहार दोन एकरात तयार करण्यात येणार आहे. जि.प.कडून १ कोटी १३ लाखां निधी मंजूर झाला आहे. काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. आ.संजयमामा शिंदे यांच्या मार्फत समाजकल्याण मंत्रालयाकडे ४ कोटी निधीची मागणी केली आहे.

    अॅड. सचिन देशमूख , जि.प.सदस्य