सोलापूरच्या डॉ. इशा वैद्य यांची ‘मिस इंडिया’ स्पर्धेसाठी निवड

    सोलापूर : सोलापूर येथील डॉ. इशा अभय वैद्य यांची निवड मिस इंडिया स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या त्या पहिल्याच सोलापूरकर आहेत. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची निवड 26 मुलींमध्ये झाली होती. त्यानंतर जयपुर मध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या चाचणीत देखील त्यांनी सहभाग नोंदवला. सध्या दिल्ली येथील तिसऱ्या चाचणीत त्या सहभागी झाल्या आहेत.

    डॉ. इशा वैद्य या व्यवसायाने दंतरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार रंगा अण्णा वैद्य यांच्या पुतणे डॉ.अभय वैद्य यांची त्या कन्या आहेत. मागील काही महिन्यापासून त्यांनी सौंदर्य स्पर्धेच्या दृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली होती. सातत्याने त्यांनी विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी नोंदवला होता.

    या सौंदर्य स्पर्धेचे स्वरूप ‘ब्युटी विथ ब्रेन’ या अशा प्रकारचे असते.योग्य आहार, व्यायामासोबत या प्रकारच्या स्पर्धांसाठी सामान्य ज्ञान व वैचारिक अभ्यासाची जोड देण्याचे काम त्यांनी सातत्याने चालू ठेवले. कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी केवळ स्वयंअध्ययनाच्या आधारावर काम सुरू केले आहे.

    यापूर्वी त्यांना ग्लॅमानंद ग्रुप पुरस्कृत सौंदर्य स्पर्धेमध्ये संधी मिळाली. तेव्हा फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात त्यांची निवड 26 मुलींमध्ये झाली. त्यानंतर जयपुर मध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या चाचणी त्यांनी सहभाग नोंदवला. आता त्या सध्या दिल्लीमध्ये होणाऱ्या चाचणीत सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेत त्यांची निवड झाल्यास पुढील काळात मिस इंटरनॅशनल , मिस मल्टिनॅशनल , मिस ग्रंड मल्टिनॅशनल , मिस टुरिझम , मिस एशिया पॅसिफिक आदीं स्पर्धांमध्ये त्यांना संधी मिळणार आहे.