मालमत्ता धारकांकडे ७ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी ; अकलूज नगर परिषदेने बीएसएनएलला पाठवली जप्तीची नोटीस

अकलूज शहरातील प्रभाग २ मधिल नागरीकांकङे २ कोटी ३५ लाख ४३ हजार, प्रभाग ३ मधुन २ कोटी २७ लाख १५ हजार व प्रभाग ६ मधुन १ कोटी ७३ लाख रुपये येणे आहेत. सध्या नगर परिषदेच्या नियमानुसार घरपट्टी लावण्यात आलेली नाही. पुढील आर्थिक वर्षापासून नगर परिषदेच्या दरानुसार घरपट्टी आकारण्यात येईल. जे नागरीक वारंवार सांगूनही थकबाकी भरणार नाहीत अशांच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के प्रमाणे व्याज आकारणी करण्यात येईल.

    अकलूज :अकलूज व माळेवाडी हद्दीतील सुमारे १५ हजार मालमत्ता धारकांकडे सुमारे ७ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी असून अशा थकबाकीदारांकडून वसुली मोहीम जोरात सुरु असल्याची माहीती प्रशासक तथा मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी दिली.

    जाधव म्हणाले, अकलूजमधील १० हजार व माळेवाङी मधील १ हजार २५० नागरीकांकडे मालमत्तेवरील कराची ५ कोटी २२ लाख रुपये, पाणीपट्टीची २ कोटी रुपये थकबाकी येणे आहे. यामध्ये गाळाभाङेची येणे रक्कम १ कोटी रुपये आहे.

    अकलूज शहरातील प्रभाग २ मधील नागरीकांकडे २ कोटी ३५ लाख ४३ हजार, प्रभाग ३ मधुन २ कोटी २७ लाख १५ हजार व प्रभाग ६ मधुन १ कोटी ७३ लाख रुपये येणे आहेत. सध्या नगर परिषदेच्या नियमानुसार घरपट्टी लावण्यात आलेली नाही. पुढील आर्थिक वर्षापासून नगर परिषदेच्या दरानुसार घरपट्टी आकारण्यात येईल. जे नागरीक वारंवार सांगूनही थकबाकी भरणार नाहीत अशांच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के प्रमाणे व्याज आकारणी करण्यात येईल.

    अकलूज नगरपरिषदेची बीएसएनएल टॉवरला थकबाकी जप्तीची नोटीस

    अकलुज नगर परिषद क्षेत्रातील जुना पंढरपूर रोड येथील बीएसएनएल या कंपनीला मागील ११ वर्षापासून थकीत असलेल्या थकबाकी करा संदर्भात लेखी बील देऊनही जवळपास २६ लाख ५६ हजार ८२९ रुपये थकबाकी भरली नाही. त्यामुळे अकलूज नगरपरिषदचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी जप्तीचा आदेश दिला आहे.सदर थकबाकी मध्ये BSNL च्या कॅश काऊंटर बिल्डिंग, स्टाफ क्वार्टर बिल्डिंग १, स्टाफ क्वार्टर बिल्डिंग २, टी. ई. मेन बिल्डिंग व BSNL टॉवर या मालमत्तेचा समावेश आहे.

    नागरीकांकडे अडकून पडलेल्या या रकमेमुळे शहरातील विकास कामे पुर्ण करण्यात अङथळा येत आहे. शहरातील सिमेंट रस्ते दुरुस्ती करण्यासाठी सुमारे २८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विकासकामे वेळेत पुर्ण होण्यासाठी नागरीकांनी घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाङे व इतर कर वेळेत भरावेत आसे धैर्यशील जाधव यांनी सांगितले.