सोलापूर शहरातील संचारबंदीमुळे प्रभावी नाकाबंदी

 सोलापूर : सोलापूर शहरात संचारबंदी असल्यामुळे कुठल्याही वाहनाला प्रवेश दिला जात नाही. जे प्रवासी सोलापूर बायपासमार्गे पुणे आणि आदी. शहरात जाणारे आहेत. त्यांनाच परवानगी दिली जात आहे. शहरात येण्याचा प्रयत्न करणारे बहुतांश दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक दवाखान्याचे कारण सांगून शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोलापूर शहरात येण्यासाठी असलेले प्रवेशद्वार नाकाबंदी करण्यात आले असून, पोलीस प्रवाशांची किंवा वाहनांची चौकशी करूनच गरजू लोकांना प्रवेश देत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरात आज ८ ठिकाणांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. यामध्ये सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, फौजदार चावडी पोलीस ठाणे आणि जेलरोड पोलीस ठाणे अशा आठ ठिकाणांवर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच हैदराबाद रोड, विजापूर रोड, अक्कलकोट रोड, पूणे रोड, तुळजापूर रोड, अशा विशेष ठिकाणी सुद्धा नाकाबंदी करण्यात आली आहे.