बार्शीत सणासुदीच्या दिवसात विजेचा लपंडाव; ‘महावितरण’वर भाविकांची नाराजी

नवरात्रोत्सवामुळे अनेक भाविक विशेषतः महिलावर्ग देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. परंतु दिवसा आणि रात्रीही अचानकपणे विद्युत पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शहरात सध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू आहे. सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नुकतीच मंदिरे उघडली आहेत. नवरात्रोत्सवामुळे अनेक भाविक विशेषतः महिलावर्ग देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. परंतु दिवसा आणि रात्रीही अचानकपणे विद्युत पुरवठा बंद (Electricity not Continue) केला जात आहे. त्यामुळे विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  सध्या ऑक्टोबर हीट असल्याने दिवसा उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उकाड्याचे प्रमाण वाढले खूप वाढले असताना विद्युत वितरण विभागाकडून मात्र सतत वीज पुरवठा खंडित केला जातो. वसुली करताना देखील विद्युत विभागाकडून वीज पुरवठा बंद केला जातो. यामुळे मात्र प्रामाणिक आणि वीज भरणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात तरी विद्युत विभागाने घालवणे थांबवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

  वसुलीसाठी काहीवेळा वीज बंद करावी लागते

  याबाबत विद्युत वितरण विभागाचे अभियंता गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वसुलीसाठी काहीवेळा वीज बंद करावी लागते. तर आज शहरात काही ठिकाणी काम सुरू असल्याने वीज बंद आहे.

  वीज गेल्याने रात्रीची रोषणाई दिसून येत नाही

  माळी गल्ली नवरात्र मंडळाचे पदाधिकारी भरत जाधव यावेळी म्हणाले, विद्युत विभागाकडून एकदाच किती तास वीज जाणार आहे? हे स्पष्ट करावे. रात्री आणि दिवसाही तासातासाला अर्ध्या तासासाठी घालवणे योग्य नाही. खूप दिवसांनी मंदिरे सुरू झाल्याने भाविकांची गर्दी होत आहे. मात्र, वीज गेल्याने रात्रीची रोषणाई दिसून येत नाही, यामुळे भक्तगण नाराज होतात.