सलून, ब्युटी पार्लर व्यवसायाला लॉकडाऊनमधून वगळा ; राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधीर गाडेकर यांची मागणी 

इतर सर्व व्यवसायांना लॉक डाऊन कळत वेळेची सवलत देऊन आमचाच व्यवसाय बंद करून एक प्रकारे सकल नाभिक समाजावर हा अन्यायच नाही का?पुन्हा लॉकडाऊन लादून समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाचा विरोध करण्यासाठी समाजावर नाईलाजाने रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल, आणि याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल याची नोंद घ्यावी.

    कुर्डूवाडी  : नाभिक समाजाच्या पारंपरिक सलून व ब्युटी पार्लर व्यवसायाला लॉक डाऊन मधून वगळावे, अशी मागणी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधीर गाडेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    निवेदनात म्हटले आहे, हातावर पोट असलेला नाभिक समाज कोरोनामुळे पुरता अडचणीत सापडला आहे.उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनीही पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर नाभिक समाज पुरता हवालदिल झाला आहे.आर्थिक समस्यांना कंटाळून मागील लॉक डाऊन काळात नाभिक समाजाच्या सोळा बांधवांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून जीवन संपविले आहे.

    शासनाकडे वारंवार आर्थिक मदतीची विनंती तथा निवेदन देऊनही अद्याप कसलीही दखल घेतलेली नाही. नाभिक समाजाने कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या सर्व आदेशाचे काटेकोर पालन करून शासनास नेहमीच सहकार्य केलेले असून सलून तथा ब्युटी पार्लर व्यवसायातून संसर्ग झालेला नाही.मग आमच्याच व्यवसायावर हा अन्याय का?