narendra patil

    सोलापूर : नव्या मागासवर्गीय आयोगातून मराठा आरक्षण द्वेषींची हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा आक्रोश मोर्चाचे प्रमुख नरेंद्र पाटील यांनी केली.

    सोलापूरात 4 जुलै रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रताप कांचन, किरण पवार, राम जाधव, अनंत जाधव, सुरेश पाटोळे यांची उपस्थिती होती.

    रविवारच्या मोर्चाची अधिक माहिती पाटील यांनी देताना हा मोर्चा सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे . दरम्यान सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची याचिका फेटाळली असून, केंद्र सरकारला सर्व अधिकार दिले आहेत.

    सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समिती बरखास्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने नव्याने गठीत केलेल्या मागासवर्गीय आयोगात मराठा आरक्षण द्वेषी आहेत. त्यांची प्रथम हकालपट्टी करावी, आरक्षण लढाईतील मराठा नेत्यांची नेमणूक करावी, राज्यात नव्याने मराठा समाजाचा सर्व्हे करावा अशा मागण्या करत नरेंद्र पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.