मार्कंडेय रूग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट ; रूग्णांच्या नातेवाईकांचा टाहो , मनपा पथक घटनास्थळी दाखल

ऑक्सीजन टाकीचा स्फोट होताचं रूग्णालय प्रशासनानी प्रसंगावधान राखून लोकांना बाहेर काढले. रूग्णालयातील रूग्ण सुरक्षित आहेत. कोणाला ही धोका झाला नाही. नातेवाईक आणि रूग्णांनी कोणत्या ही अफवांवर विश्वास ठेवू नये , असे आवाहन रूगणालय प्रशासनाने केले आहे.

    सोलापूर : सोलापूर शहरातील श्री.मार्कंडेय सहकारी रूग्णालयात बुधवारी रात्री अचानकपणे ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली. रूगण आणि नातेवाईकांची दमछाक झाली, परिसरातील राहणाऱ्या नागरिकांची धावपळ उडाली. सिलेंडरच्या स्फोटानी पुर्वभाग हादारले आहे. महानगर पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रूग्ण ,नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांशी त्यांचा संवाद सुरु आहे.

    याबाबात मिळालेल्या माहीतीनुसार, मार्कंडेय रूग्णालयात रात्री अचानकपणे रिकाम्या ऑक्सीजन टाकीचा स्फोट झाला अन् रूग्ण नातेवाईक सैरावैर पळत सुटले.ऑक्सीजनच्या रिकाम्या टाकीचा स्फोट झाला आहे. त्यामूळे रूग्णालय परिसरात धूळ पसरली होती.या मध्ये काही लोक गुदमरले होते.तेथील रूग्णांना दुसऱ्या इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. स्फोटात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.काळजी करण्यासारखे काही नाही.

    स्फोट कशामूळे झाला याची चौकशी करण्यात येईल त्यानंतर रूग्णालयावर योग्य ती कायदेशीर कारवाई करु आशी माहीती मनपा आयुक्त पी.शिवशंकर यांनी पञकारांशी बोलताना दिली.