बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात, गांजा लावण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याची मागणी

राज्यातील पालेभाज्यांसह वांगी, टोमॅटो, कोबींचे दर गडगडले असून भाजी अक्षरश: रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने दोन एकरात गांजा लावण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून आता राज्य सरकारकडे देखील केली आहे.

    मोहोळ : राज्यात नैसर्गिक संकटे आणि हमीभावाचा पार सतत ढासळत असल्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. बळीराजाची अवस्था हालाकिची झाल्यामुळे गांजा लावण्याची परवानगी द्या, अशा प्रकारची मागणी एका शेतकऱ्याने राज्य सरकारकडे केली आहे.

    राज्यातील पालेभाज्यांसह वांगी, टोमॅटो, कोबींचे दर गडगडले असून भाजी अक्षरश: रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने दोन एकरात गांजा लावण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून आता राज्य सरकारकडे देखील केली आहे.

    दोन एकरात गांजा लावण्याची परवानगी द्यावी

    अनिल आबाजी पाटील या शेतकऱ्याने सरकारने दोन एकरात गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देऊन आता राज्य सरकारकडे मागणी केली आहे. असं वृत्त पुढारी ऑनलाईनने दिले आहे.

    दोन एकर गांजा लावण्यास परवानगी मिळणेबाबत हताश शेतकऱ्याचं पत्र…

    मी शेतकरी असून कोणतेही पीक घेतले, तरी शासनाकडून हमी भाव मिळत नसल्याने तोट्यात शेती करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे कठिण झालं आहे. मशागतीसाठी केलेला खर्चही मिळत नाही. एखाद्या कारखान्याला उस गाळपासाठी दिला, तरी त्याचे बिल लवकर मिळत नाही. त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्याने मला माझ्या दोन एकर शेतीत गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. अशा प्रकारचं परवानगी पत्र एका हताश शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं आहे.