अखेर अभिजीत बिचुकले यांचे डिपॉझिट जप्त ; मतमोजणीच्या १९ फेऱ्यानंतर मिळाली ५४ मते

मराठी बीग बॉस या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिजीत बिचुकले यांनी यापूर्वी वरळी विधानसभा मतदार संघातूनही निवडणूक लढवली होती. त्यांनतरपंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक आपणच जिंकणार, असा तथ्यहीन दावाही बिचुकले यांनी केला होता.  

    पंढरपूर: आपल्या बेताल वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेले अभिजीत बिचुकले यांनी नेहमीप्रमाणे अपक्ष उमेदवारी अर्ज भरत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उडी घेतली होती.मात्र नेहमीप्रमाणे इथेही माती खात त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.
    आज सकाळपासूनच पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. मात्र मतमोजणीसाच्या तब्बल १९ फेऱ्या पार पडल्यानंतर बिचुकलेच्या झोळीत ५४ मताचे दान मिळाले आहे.

    मराठी बीग बॉस या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिजीत बिचुकले यांनी यापूर्वी वरळी विधानसभा मतदार संघातूनही निवडणूक लढवली होती. त्यांनतरपंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक आपणच जिंकणार, असा तथ्यहीन दावाही बिचुकले यांनी केला होता.

    दुसरीकडे भाजप व राष्ट्रवादीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत २५ व्या फेरीअखेरीस भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी तब्बल ६२०० मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके पिछाडीवर आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.