महाराष्ट्रातील पहीलाचं प्रयोग : मानसिक तणाव घालविण्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा ; सीईओ दिलीप स्वामी यांचा उपक्रम

सोलापूर जिल्हा परिषदेने ५००० किंवा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून नुकताच घेतला असून अनेक गावात मागील तीन चार दिवसांपासून कोविड केअर सेंटर उभे केलेले आहेत. महिला रुग्णांना पुरुष वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्याशी त्यांच्या अडचणी व इतर होणारा त्रास बोलणे अडचणीचे होते. त्यातच ग्रामीण भागातील महिलांना याबाबत अधिकच अडचणीचा सामना करावा लागतो.

    सोलापूर : सोलापूर जिल्हयातील भयभीत कोरोना रूग्णांची भीती घालविण्यासाठी जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांनी नवीन संकल्पना आणली आहे. सदय परिस्थितीत या उपक्रमाची महाराष्ट्राला गरज भासणार आहे.

    या उपक्रमाबाबत सीईओ दिलीप स्वामी नवराष्ट्रशी बोलताना म्हणाले ,सध्या कोरोना संसर्गात प्रत्येक माणूस मानसिक दबावाखाली राहत आहे. आशा परिस्थिती कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने तो आणखीन दडपणात येतो.जि.प.च्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रत्येक कर्मचारी ताणवाखाली आहे. कोविड केअर सेंटरसह सार्वजनीक ठिकाणी तणाव घालविण्यासाठी ऑनलाईनद्वारे व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेची स्थापना करण्यात आली असून जिल्हयात सर्वत्र हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश सर्व विभाग प्रमूख गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत.कार्यशाळेची सुरुवात महाराष्ट्र दिनी करण्यात येणार आहे. व्याख्यान, किर्तन, गायन, एकपात्री नाटक,विविध कला प्रदर्शन करण्यात येणार आहे.

    जि.प.प्रशासनाच्या वतीने आत्ता पर्यंत माझं गाव कोरोना मुक्त गाव, ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक शपथ घेणे, जनजागृतीपर प्रभात फेरी, माझ दुकान माझी जबाबदारी ,यासह महीलांसाठी विशेष कोविड केअर सेंटर उभे करण्यात आले आहेत.गाव तिथे कोविड सेंटर उपक्रमांतर्गत महिला रुग्णांसाठी महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती. राज्यातील पहिलाच प्रयोग.

    सोलापूर जिल्हा परिषदेने ५००० किंवा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून नुकताच घेतला असून अनेक गावात मागील तीन चार दिवसांपासून कोविड केअर सेंटर उभे केलेले आहेत. महिला रुग्णांना पुरुष वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्याशी त्यांच्या अडचणी व इतर होणारा त्रास बोलणे अडचणीचे होते. त्यातच ग्रामीण भागातील महिलांना याबाबत अधिकच अडचणीचा सामना करावा लागतो. महिला कोरोना रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन सीईओ स्वामी यांनी ग्रामीण भागातील सध्या सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये महिला रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी महिला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. यापुढे जाऊन गाव तिथे कोविड सेंटर या उपक्रमातील सेंटरमध्ये ही अशा प्रकारचे महिला आरोग्यअधिकारी व आरोग्य कर्मचारी नियुक्तीचे आदेश काढले जाणार आहेत.अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागातील महिला रुग्णांनी स्वागत केले असून महिला रुग्णां मधून या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.