आ.राजेंद्र राऊत यांच्या समोर समस्या मांडताना जि.प.अध्यक्ष अनिरूध्द कांबळे ,बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, माजी सदस्य बाळासाहेब देशमूख यांच्यासह उपस्थित कार्यकर्ते
आ.राजेंद्र राऊत यांच्या समोर समस्या मांडताना जि.प.अध्यक्ष अनिरूध्द कांबळे ,बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, माजी सदस्य बाळासाहेब देशमूख यांच्यासह उपस्थित कार्यकर्ते

-स्थायी जीबीचा अधिकार देण्याची मागणी

    सोलापूर : जिल्हा परिषद सदस्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांच्या वाढीव कालावधीसाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत रणांगणात उतरले आहेत. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्धा लक्षवेधी करणार आहेत.

    आ.राजेंद्र राऊत हे सोमवारी जिल्हा परिषदेत दाखल होऊन अध्यक्ष अनिरूध्द कांबळे , अर्थ बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. कोरोनाच्या नावाखाली राज्यसरकार स्थायी आणि सर्वसाधारण सभेवर निर्बंध लादत आहे. पदाधिका-यांचा मुलभूत अधिकार हिरावून तो सीईंओंना देण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्री आणि अौषधे खरेदीचा ५० लाखांचा अधिकार स्थायी ,सर्वसाधारण सभेला देण्यात यावा आशी मागणी करणार असल्याचे आ.राऊत म्हणाले.

    पुढे बोलताना आ.राऊत म्हणाले पदाधिकाऱ्यांची कोणती ही सभा सभागृहात होत नाही मात्र पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठका होतात. त्यावेळी कोरोना संसर्ग वाढत नाही का ? मग जि.प.पदाधिकाऱ्यांच्या अधिकारांवर निर्बंध का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान राज्यभरातून जि.प. एकवटत असून मुदतवाढीसाठी चळवळ उभी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद ,पंचायात समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र संघटनेकडून पाठपूरावा करण्यात येत आहे.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्य निवडणूक आयोगाकडे वाढीव कालावदीसाठी मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या म्हणण्यानूसार मार्च २०२० पासून संपूर्ण देशामध्ये सुरु असलेल्या कोरोना महामारीमूळे राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायात समिती सदस्य यांना आपला कार्यकाळ ५ वर्षाचा असून देखील व्यवस्थीत पुर्ण करता आला नाही. त्यामूळे नैसर्गिकरित्या सदस्यांच्या अधिकारांवर अन्याय होत आहे. राज्यातील संपूर्ण सदस्यांचा दोन वर्षांचा कालावधी वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.