इंदापूरनजीक भीषण अपघातात चार ठार ; मयतामध्ये पंढरपूर तालुक्यातील तिघांचा समावेश

पारी तीनच्या सुमारास पुणे सोलापूर हायवे वर असलेल्या इंदापूर शहरानजीक असणाऱ्या पायल हॉटेल जवळ दोन चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला अपघातातील ईरटीका वाहन एम एच ४६ बीई ४५१५ पुण्याकडे जात असताना सदर वाहनाचे टायर फुटल्याने हे वाहन डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने पुढे गेल्यामुळे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या बोलेरो वाहन क्रमांक एम एच १३ एझेड ३९०१ या वाहनाचे समोरासमोर जोरदार धडक झाल्याने सदर अपघातात एका वाहनातील तीन जण तर एका चारचाकीतील  एक जण असे चार जण जागीच ठार झाले आहे.

    पंढरपूर : सोलापूर पुणे हायवे वर असलेले इंदापूर नजीक ईरटीका बोलेरो कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले यामध्ये पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील तिघांचा समावेश आहे.

    याबाबत समजलेली अधिक माहिती अशी,  दुपारी तीनच्या सुमारास पुणे सोलापूर हायवे वर असलेल्या इंदापूर शहरानजीक असणाऱ्या पायल हॉटेल जवळ दोन चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला अपघातातील ईरटीका वाहन एम एच ४६ बीई ४५१५ पुण्याकडे जात असताना सदर वाहनाचे टायर फुटल्याने हे वाहन डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने पुढे गेल्यामुळे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या बोलेरो वाहन क्रमांक एम एच १३ एझेड ३९०१ या वाहनाचे समोरासमोर जोरदार धडक झाल्याने सदर अपघातात एका वाहनातील तीन जण तर एका चारचाकीतील  एक जण असे चार जण जागीच ठार झाले आहे. बोलेरो वाहनातील तीन मयत हे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावचे रहिवाशी असून यामध्ये गणेश गोडसे, गोविंद पोपटराव गोडसे, अविनाश पवार, यांचा समावेश असल्याची माहिती समजते तर ईरटिका वाहनातील मयत व्यक्तीचे नाव समजू शकले नाही सदर झालेल्या भीषण अपघातातील मृत व्यक्तींना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे समजते.