विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

फिर्यादी आश्विनी यांची कोणतीही चूक नसताना विनाकारण स्वयंपाकावरून व धुणी-भांडीवरून लायकी काढत होते. त्यानंतर फिर्यादीला तू वेडी आहेस, असे म्हणून मानसिक व शारीरिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

    सोलापूर : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी व तिला शारीरिक व मानसिक त्रास (Harassment a married woman) दिल्याची घटना ३० जून २०२१ ते ६ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी आश्विनी शुभम जाधव (वय-२४,रा. कैकाडी गल्ली, उत्तर कसबा, बाळीवेस सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती शुभम आनंद जाधव (वय-२४), संगीता आनंद जाधव (वय-४०), आनंद दत्तू जाधव (वय-५०), अंजली आनंद जाधव (वय-२३) सर्व रा.साई अंबर रेसिडेन्सी पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीचे लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत वरील संशयित आरोपींनी मिळून फिर्यादी आश्विनी यांची कोणतीही चूक नसताना विनाकारण स्वयंपाकावरून व धुणी-भांडीवरून लायकी काढत होते. त्यानंतर फिर्यादीला तू वेडी आहेस, असे म्हणून मानसिक व शारीरिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक कामूर्ती हे करीत आहेत.