Crime

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत पंढरपूर शहरातील लॉज मध्ये कोरोना तपासणी करून बनावट अहवाल तयार करून देत असल्याची माहिती मिळाल्याने पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली असता आदमिले रिपोर्ट तयार केल्याचे तसेच अँटीजेन रॅपिड टेस्ट किट पुरवणारा उमेश शिंगटे यांनी रिपोर्ट तयार केल्याचे मान्य केले. सदर रिपोर्ट बनवण्याचे काम गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू होते. या दोघांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पंढरपूर :  तालुका कृती समिती मार्फत पंढरपूर शहरातील अनधिकृत टेस्टिंग तयार करून देणाऱ्या वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब वर उपजिल्हा रुग्णालयाचे पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले, नायब तहसीलदार कोळी व पोलिसांच्या पथकाने धाड टाकली. वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब चालकास अवैध रिपोर्ट तयार करताना रंगेहात पकडून त्याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत पंढरपूर शहरातील लॉज मध्ये कोरोना तपासणी करून बनावट अहवाल तयार करून देत असल्याची माहिती मिळाल्याने पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली असता आदमिले रिपोर्ट तयार केल्याचे तसेच अँटीजेन रॅपिड टेस्ट किट पुरवणारा उमेश शिंगटे यांनी रिपोर्ट तयार केल्याचे मान्य केले. सदर रिपोर्ट बनवण्याचे काम गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू होते. या दोघांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम यांनी, अशा प्रकारची कोणतीही अनधिकृत कोवीड टेस्टिंग आपल्या रुग्णालय अहवालांमध्ये केली जात नाही. याची पंढरपूर शहर व तालुक्यातील तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आणि लँब चालक यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. यापुढे असे प्रकार आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. गिराम यांनी दिला आहे.