प्राथमिक शिक्षणाधिकारीचे गौडबंगाल : पाहुण्यांची मर्जी सांभाळण्यासाठी शिक्षकाची बदली ; विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांची तक्रार

एका शिक्षकासाठी शिक्षण समिती बदलीचा ठराव करू शकते तर गेल्या अनेक वर्षापासून बदलीसाठी धडपड करणाऱ्या शिक्षकांची बदली का करण्यात येत नाही असा सवाल शिक्षक संघटनेकडून विचारला जात आहे शिक्षण समितीला बदली करण्याचा अधिकार देण्यात आला असेल तर बदलीच पात्र असणाऱ्या वंचित शिक्षकांची तात्काळ बदली करण्यात यावी

    सोलापूर : सोलापुर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांच्या कारभारात गौडबंगाल असल्याचा आरोप होत आहे. मर्जीतील शिक्षकाची बदली करण्यात आली. आहे ३० जून रोजी च्या शिक्षण समितीचा ठराव सादर करून चव्हाण नामक शिक्षकाची बदली करण्यात आली आहे.

    प्राथमिक शिक्षणाधिकारी राठोड यांच्या कारभारामुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन वर्ष वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मर्जीतील एकाच व्यक्तीची कशी बदली होते असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी राठोड यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी स्वतःच्या पत्नी ची बदली ऑनलाइन पद्धतीनुसार बदली करण्या ऐवजी शासनाचे आदेश असताना हे आदेश डावलून आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत ऑफलाईन द़वारे बदली केली होती .

    हे प्रकरण ताजे असताना मर्जीतल्या शिक्षकाची बदली केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.शिक्षकांच्या बदल्या वरून अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत काही शिक्षकांना अद्याप पर्यंत पदस्थापना देण्यात आली नाही. चव्हाण या शिक्षकांची अक्कलकोट गौडगाव येथून जिल्हा परिषदेच्या नेहरू वस्तीग्रह येथे बदली करण्यात आली आहे. वास्तविक पाहता वस्तीग्रह कोरोना संसर्ग मुळे बंद असल्याने सद्यस्थितीत तिथे शिक्षकांची नियुक्ती करणे उचित ठरत नसल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे .या सर्व प्रकारावर बदली करण्यात आलेला आदेश तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी सदस्यांकडून होत आहे.

    एका शिक्षकासाठी शिक्षण समिती बदलीचा ठराव करू शकते तर गेल्या अनेक वर्षापासून बदलीसाठी धडपड करणाऱ्या शिक्षकांची बदली का करण्यात येत नाही असा सवाल शिक्षक संघटनेकडून विचारला जात आहे शिक्षण समितीला बदली करण्याचा अधिकार देण्यात आला असेल तर बदलीच पात्र असणाऱ्या वंचित शिक्षकांची तात्काळ बदली करण्यात यावी