Give Dhangar Samaj candidate otherwise ... BJP, NCP warned of rebellion Pandharpur Assembly by-election

या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघातील धनगर समाज उमेदवारीसाठी आक्रमक झाला आहे. मंगळवेढा तालुक्‍यात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. मागील तिन्ही विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने आमदार भारत भालके यांना मदत केली होती. त्यामुळे भालके यांचा विजय सोपा झाला होता. त्यांच्या निधनानंतर धनगर समाजाने उमेदवारीची मागणी करत निवडणुकीत बंड करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भालके गटात खळबळ उडाली आहे.

    पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच धनगर समाजाने राष्ट्रवादी व भाजपकडे उमेदवारीची मागणी करत, विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. पोटनिवडणुकी संदर्भात होळकरवाडा येथे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील धनगर समाज बांधवांची बैठक झाली. त्यात पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

    मतदारसंघात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. या मतदारसंघात आतापर्यंत धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. महाविकास आघाडी किंवा भाजपने धनगर समाजाला उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अन्यथा धनगर समाजाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल, अशा इशारा धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य सन्वयक प्रा. सुभाष मस्के यांनी दिला.

    दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघातील धनगर समाज उमेदवारीसाठी आक्रमक झाला आहे. मंगळवेढा तालुक्‍यात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. मागील तिन्ही विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने आमदार भारत भालके यांना मदत केली होती. त्यामुळे भालके यांचा विजय सोपा झाला होता. त्यांच्या निधनानंतर धनगर समाजाने उमेदवारीची मागणी करत निवडणुकीत बंड करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भालके गटात खळबळ उडाली आहे.

    आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत आचारसंहिता जाहीर होण्याची शक्‍यता आहे. पंढरपूरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भालके यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. तर भाजपकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवार दिली जाईल, अशी चर्चा आहे.

    विधान परिषेदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका अजूनही गुलदस्तात आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. परिचारक गट सध्या तरी पोटनिवडणूक लढवण्याच्या मन:स्थितीत नसल्याची चर्चा आहे.