एससी, एसटी प्रवर्गाला पदोन्नतीमध्ये आरक्षण द्या; आरपीआयकडून निदर्शने

    करमाळा : एससी, एसटी प्रवर्गाला पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालय येथे आरपीआय (आ) च्या वतीने अर्जुनराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली निर्दशने करण्यात आले.

    आरपीआयकडून निदर्शने करमाळा तहसील कार्यालय येथे आरपीआय (आ) च्या वतीने अर्जुनराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली निर्दशने करण्यात आले. त्यावेळी दिलेल्या निवेदनात पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने ७ मे २०२१ रोजी जीआर काढून त्याला स्थगिती दिली. हा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे.

    सदरचा जीआर रद्द करुन पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) करमाळा शहर व तालुका यांच्या वतीने निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष अर्जुनराव गाडे, सुरेश झेंडे जिल्हा उपाध्यक्ष , बाळासाहेब टकले, धनगर आघाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र सरतापे, ता.सरचिटणीस, मच्छिंद्र चव्हाण युवक आघाडी तालुकाध्यक्ष, पोपट कदम तालुका संघटक, सुभाष देडगे, नवनाथ गाडे, विष्णू चांदणे, शरदराव पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.