“आम्हाला न्याय द्या” , सस्ते कुटुंबियांची सरकारकडे मागणी

सस्ते कुटुंबियांची मांडवे येथे शेती आहे. या शेतामध्ये काही महिन्यांपुर्वी शेजारील शेत मालकाने भुमीआभिलेख कङुन मोजणी आणली. त्या मोजणीमध्ये सस्ते यांच्या शेतात सूमारे २० गुंठे क्षेञात खांब रोवण्यात आले. या मोजणीची आम्हाला भुमीअभिलेखाने कोणतीही नोटीस दिली नव्हती. ही मोजणी परस्पर करण्यात आली असून ती आम्हास मान्य नसल्याचे सस्ते यांनी भुमीअभिलेखच्या अधिका-यांना सांगितले .

    अकलुज : मांडवे, ता. माळशिरस येथिल पोपट मारुती सस्ते व संदिप सस्ते यांच्या शेतात शेजा-यांनी अतिक्रमण केले आहे. पोलीस आणी भुमिअभिलेख खातेही आम्हाला मदत करत नसल्याची तक्रार आज सस्ते यांनी पञकार परिषदेत मांडली. आता सरकारनेच न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

    सस्ते कुटुंबियांची मांडवे येथे शेती आहे. या शेतामध्ये काही महिन्यांपुर्वी शेजारील शेत मालकाने भुमीआभिलेख कङुन मोजणी आणली. त्या मोजणीमध्ये सस्ते यांच्या शेतात सूमारे २० गुंठे क्षेञात खांब रोवण्यात आले. या मोजणीची आम्हाला भुमीअभिलेखाने कोणतीही नोटीस दिली नव्हती. ही मोजणी परस्पर करण्यात आली असून ती आम्हास मान्य नसल्याचे सस्ते यांनी भुमीअभिलेखच्या अधिका-यांना सांगितले . असे असतानाही भुमी आभिलेख कार्यालयाने सदर व्यक्तींना मोजणीचे नकाशे उपलब्ध करुन दिल्यामुळे सदर व्यक्तींनी आमच्या क्षेञात खांब रोवून अतिक्रमण केले. आमच्या ऊस पिकाचे नुकसान केले आहे. याबाबात आम्ही नातेपुते पोलीसांकङे गेलो असता त्यांनीही आमची दखल घेतली नाही. उलट “आम्हालाच आत बसवू” . असा दम दिला आहे. नातेपुते पोलीस आमची तक्रार घेत नसल्यामुळे आम्ही अकलूज ङीवायएसपींकडे तक्रार दिलेली आहे. माळशिरस येथिल भुमी अभिलेखचे कर्मचारी व आधिकारी, नातेपुते पोलीस आमच्यावर अन्याय करत आहेत. आम्हाला न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपञांकडे आमची कैफियत मांडत असल्याचे संदिप सस्ते यांनी सांगितले.