Video : रुक्मिणी मातेच्या प्रभावळेला सोन्याचा मुलामा

श्रावण महिन्याच्या निमित्ताने पुण्यातील नवनाथ भिसे या भाविकाने ‌रुक्मिणी मातेच्या मंदिरातील मूर्ती मागील चांदीच्या प्रभावळीला सोन्याचा मुलामा दिला आहे.

    पंढरपूर : पंढरपूरच्या रुक्मिणी मातेच्या पाठीमागील प्रभावळीला सोन्याची झळाळी दिली आहे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने पुण्यातील नवनाथ भिसे या भाविकाने ‌रुक्मिणी मातेच्या मंदिरातील मूर्ती मागील चांदीच्या प्रभावळीला सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यामुळे ही प्रभावळ सुंदर दिसत आहे. यासाठी एक लाख रुपयांचा खर्च आला आहे.

    मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. याचा परिणाम मंदिर समितीला मिळणाऱ्या देणगीवर झाला आहे. अलीकडेच मुंबई येथील एका भाविकाने मंदिर समितीला प्रथमच एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर आता पुणे येथील एका भाविकाने रुक्मिणी मातेच्या पाठीमागील चांदीच्या प्रभावळीचा सोन्याचा मुलामा दिला आहे. हाच सोन्याचा मुलामा दिल्याने प्रभावळीला चकाकी आली आहे.