पंढरीच्या विठ्ठलाला दोन तोळे सोन्याची राखी दान

    पंढरपूर / राजेश शिंदे : श्रावण शुद्ध पौर्णिमेनिमित्त ज्ञानेश्वर रोहिदास भुरूक व विक्रम रोहिदास भुरुक (रा. धायरी, जिल्हा पुणे) यांनी राखी पोर्णिमेनिमित्त त्यांच्या मातोश्री इंदुबाई रोहीदास भुरूक यांच्या इच्छेनुसार यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलास दोन तोळे वजनाची सोन्याची राखी (Golden Rakhi) अंदाजित किंमत एक लाख दहा हजार रूपयाची भेट स्वरुपात आज (रविवारी) दिली.

    यावेळी रोहीदास भरूक यांचा सत्कार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विठ्ठलाचे उपरणे व समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली दैनंदिनी देऊन करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.