खुशखबर! शिक्षकदिनी मिळणार दिड हजार शिक्षकांना पदोन्नती

पदोन्नतीमध्ये विकलांग शिक्षकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी दिव्यांग कर्मचारी, अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी केली आहे. दिव्यांग कर्मचारी पदोन्नतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर १८ डिसेबर २०१४ रोजी निर्णय झाला आहे.२०१९ रोजी निर्णय झाला आहे.

    सोलापूर : शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या दिड हजार शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. ३ सप्टेंबर रोजी ऑनलाईन समुपदेशनाद्वारे मार्गी लावण्यात येणार आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन गोड होणार, अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे.

    गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी ऑनलाईन समुपदेशना घेण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. पण, माळशिरस, करमाळा तालुक्यांतील शिक्षकांच्या कनेक्टिव्हिटीबाबत अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पदोन्नती पुढे ढकलण्यात आली होती ठरल्याप्रमाणे ३ सप्टेंबर रोजी ही प्रक्रिया पुर्ण करा आशी सुचना सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली होती.२६ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे १,२७५ व दिव्यांगमधील २२७ अशा १ हजार ५०२ शिक्षकांचा विचार करण्यात आला आहे. रिक्त जागांप्रमाणे ६०० शिक्षकांचे समुपदेशन घेऊन नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

    पदोन्नतीमध्ये विकलांग शिक्षकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी दिव्यांग कर्मचारी, अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी केली आहे. दिव्यांग कर्मचारी पदोन्नतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर १८ डिसेबर २०१४ रोजी निर्णय झाला आहे.२०१९ रोजी निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे शिक्षणाधिकाऱ्यांना जानेवारी २०१० रोजीची समुपदेशन प्रक्रिया स्थगित करावी लागली होती. में सन २००५ ते २०१८ या कालावधीतील ते अनुशेष राहिलेली ५८ पदे व चालू पदोन्नतीतील आरक्षण, अशी ६६ पदे त मुख्याध्यापकांची भरावी लागणार आहेत