माऊलींच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! दररोज 10 हजार भाविकांना मिळणार श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन

माऊलींच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दररोज 10 हजार भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन मिळणार आहे(Every day 10,000 devotees will get the facelift of Shri Vitthal-Rukmini ). कोविड चाचणी गरजेची नसली तरी आरोग्य तपासणी करूनच मंदीरात सोडले जाणार आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली.

    पंढरपूर :  माऊलींच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दररोज 10 हजार भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन मिळणार आहे(Every day 10,000 devotees will get the facelift of Shri Vitthal-Rukmini ). कोविड चाचणी गरजेची नसली तरी आरोग्य तपासणी करूनच मंदीरात सोडले जाणार आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली.

    घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे. या संदर्भातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज बैठक पार पडली. विजया दशमी पासून सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये पंढरपूर मधील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. तर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे.

    दर, तासाला सातशे ते एक हजार भाविकांना मुख दर्शनाची व्यवस्था केली आहे. यामधे 50% ऑनलाईन आणि 50% ऑफलाईन दर्शन दिले जाणार आहे. दहा वर्षाखालील मुले,६५ वर्षावरील नागरिक आणि गर्भवती महिलांना शासन आदेशानुसार दर्शनासाठी बंदी कायम ठेवली आहे. दर्शनास येणाऱ्या भाविकांची कोरोना टेस्ट सक्तीची असणार नाही. मात्र, दर्शन रांगेत आल्यानंतर सर्व भाविकांची आरोग्य तपासणी केली जाणार आ्हे. तसेच मंदिरांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.