वाढीव कालावधीसाठी जि.प.सदस्य एकवटले, चळवळीला गती देण्याचा मानस ; मुख्यामंत्र्याकडे केली मागणी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्य निवडणूक आयोगाकडे वाढीव कालावदीसाठी मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या म्हणण्यानूसार मार्च २०२० पासून संपूर्ण देशामध्ये सुरु असलेल्या कोरोना महामारीमूळे राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायात समिती सदस्य यांना आपला कार्यकाळ ५ वर्षाचा असून देखील व्यवस्थीत पुर्ण करता आला नाही.

  शेखर गोतसुर्वे, सोलापूर : वाढीव कालावधीसाठी जिल्हा परिषद राज्यभरातून एकवटले असून मुदतवाढीसाठी चळवळ उभी केली आहे. जिल्हा परिषद ,पंचायात समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र संघटनेकडून पाठपूरावा करण्यात येत आहे.

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्य निवडणूक आयोगाकडे वाढीव कालावदीसाठी मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या म्हणण्यानूसार मार्च २०२० पासून संपूर्ण देशामध्ये सुरु असलेल्या कोरोना महामारीमूळे राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायात समिती सदस्य यांना आपला कार्यकाळ ५ वर्षाचा असून देखील व्यवस्थीत पुर्ण करता आला नाही. त्यामूळे नैसर्गिकरित्या सदस्यांच्या अधिकारांवर अन्याय होत आहे. राज्यातील संपूर्ण सदस्यांचा दोन वर्षांचा कालावधी वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

  अरुण तोडकर जि.प.सदस्य सोलापूर

  कै. यशवंतराव पाटील हे २० मे १९७९ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. यांच्या काळात सर्व सभापती सदस्यांना वाढीव कार्यकाळ मिळाला असल्याचे सदस्य अरूण तोडकर यांचे म्हणणे आहे. दरम्यान आगमी विधान परिषद निवडणूक प्रारंभी राज्यातील सर्व खासदार आणि आमदारांना जि.प.व पं.स.सदस्यांच्या वाढीव कालावधीसाठी निवेदनाद्वारे लक्षवेधी करणार आहेत. सदस्यांचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर असताना मुदतवाढीच्या चळवळीला गती प्राप्त होत आहे..

  जि.प.पं.स. सदस्यांना वाढीव कार्यकाळ देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासाठी संघटनेचा पाठपूरावा सुरु आहे.

  -भारत शिंदे, राज्य उपाध्यक्ष, जि.प.पं.स.सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्य

  “सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात सदस्यांना वाढीव मुदत दिल्याची नोंद आहे. कोरोना आपत्तीमूळे मुदतवाढीची सर्व सदस्यांची एकमूखी मागणी आहे.”
  -अरुण तोडकर, जि.प.सदस्य