माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन

    सोलापूर : सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त नेहरु नगर विजापुर नाका येथील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस C ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरुण साठे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी माजी महापौर अलका राठोड, नलिनी चंदेले महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी परिवहन सभापती सुभाष चव्हाण, भटक्या विमुक्त जिल्हाध्यक्ष सुरेश राठोड, उपाध्यक्ष व्ही. डी. गायकवाड, सचिव प्रा. राहुल बोळकोटे, शोभा बोबे, अरुणा बेंजरपे, सत्यनारायण संगा, नरेश महेशवरम, नंदा कांगरे, सुनिता व्हटकर, रंजना ईरकर, मनोहर सांळुखे, विमल आरेल आदी उपस्थित होते.